दहशत माजवल्याप्रकरणी साताऱ्यातील आठ जणांवर गुन्हा; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 October 2025


सातारा  :  येथील अनंत इंग्लिश स्कूल जवळील आयडीबीआय बँकेसमोरील चौकात आठ जण दि. १७ रोजी जमाव जमवून बसले होते. बेस बॉलचे दांडे, दातऱ्याचा चाकू घेवून दहशत माजवण्यासाठी आरडाओरडा करत होते. त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

धीरज जयसिंग ढाणे (रा. चिमणपुरा पेठ, सातारा), सौरभ राजू खरात (रा. दिव्यनगरी, सातारा), साद अय्याज बागवान (रा. शनिवार पेठ), प्रसन्न नारायण दिक्षीत (व्यंकटपुरा पेठ), युवराज शिवाजी मुरारी (रा. मंगळवार पेठ), ऋषभ राजेंद्र जाधव (रा. रविवार पेठ) व अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार घोडके तपास करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोनगाव कचरा डेपोसमोर कारची दुचाकीला धडक; दुचाकीचालक जखमी
पुढील बातमी
सासपडे प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करावा; भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची मागणी, पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट

संबंधित बातम्या