भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, आर अश्विन आणि आकाश दीपने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाला एक गडी बाद करण्यात यश आलं. बांगलादेशचा खालिद अहमद हा रवींद्र जडेजाचा कसोटी क्रिकेटमधील 300 वा बळी ठरला. त्याच्या विकेटसह बांगलादेशचा कानपूर कसोटीतील पहिला डाव संपुष्टात आला. बांगलेशकडून झाकीर हसन आणि खालिद अहमद यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. शदमन इस्लामन 24, नजमुल होसेन शांतो 31, मुशफिकुर रहमान 11, लिटन दास 13, शाकीब अल हसन 9, मेहिदी हसन मिराज 20, तैजुल इस्लाम 5, हसन मेहमुद 1 या धावसंख्येवर बाद झाले.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालेद अहमद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.