सातारा : 70 हजारांच्या वायरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 ते 25 दरम्यान प्रणव उमेश गुजर रा. रविवार पेठ, वाई, ता. वाई, जि. सातारा यांची 70 हजार रुपये किंमतीची केबल वायर अज्ञाताने वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील मोकळ्या जागेतून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.