सातारा : संभाजीनगर येथील दिपसागर शिवनगर कॉलनीतील एका घरातून 72 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजी श्रीरंग चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. विविध कारणांनी घरी आलेल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी कपाटातील दागिने चोरून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास हवालदार खाडे करीत आहेत.