सातारा : सातारा जिल्हा परिषद, सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव,पाटण व जावळी पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान शनिवार दि. 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ही सार्वजनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्या क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील