सातारा : खंडाळा, जि.सातारा येथील अद्वैत अमोल परामणे या शाळकरी मुलाने अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. दरम्यान, खंडाळा तालुक्यामध्ये रौप्यपदक मिळवणारा अद्वैत पहिला खेळाडू ठरला आहे.
अहिल्यानगर येथे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्यावतीने २०२६-२७ या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये खंडाळा इंग्लिश मिडियम स्कूल, खंडाळा येथे कार्यरत ब्लॅक ड्रॅगन स्पोर्ट्स अकॅडमीच्यामधून मुले तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहेत. अद्वैत परामणे हा सहा वर्षाच्या वयोगटामध्ये खेळत असून त्याच्या उल्लेखनिय यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.