शाहूनगर जगतापवाडीत घरफोडी; सुमारे ८.९४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; परिसरात भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : शहरातील शाहूनगर जगतापवाडी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ८ लाख ९४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाहूनगर जगतापवाडी येथील कृष्णराज श्रीकृपा कॉलनीमध्ये ही घटना घडली. सेवानिवृत्त शाखा अभियंता भानुदास राजाराम कोळी (वय ६०) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ तारखेला सायंकाळी ६ वाजल्यापासून ते २३ तारखेला मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उघडून विविध सोन्याचे दागिने चोरून नेले.चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गंठण, नेकलेस, मनीमाळ, बांगड्या, अंगठी, चैन, कर्णफुले, मोतीकुड्या आदींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ८ लाख ९४ हजार रुपये इतकी आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेडकर युथ फोरमचे साताऱ्यात पोलखोल आंदोलन; सोनगाव डेपो प्रकरणातील अधिकारी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुढील बातमी
साताऱ्यात फुटपाथवर पार्क केलेल्या दुचाकीच्या डिकीमधून ३ लाखांची रोकड लंपास

संबंधित बातम्या