सातारा : येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचा आणि सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू सैफअली साजिद झारी याची वर्ल्ड बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने आयर्लंड येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील मुलांच्या इंटरनॅशनल मल्टी नेशन ट्रेनिंग कम कॉम्पिटिशन कॅम्प साठी भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. याबद्दल त्याचा महाराष्ट्राचे स्टार टू पंच अमर मोकाशी यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप व मान्यवर उपस्थित होते.
सैफअली याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भारतीय संघ निवड चाचणी मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्यामुळे त्याची आयर्लंड येथील कॉम्पिटिशन कॅम्प साठी निवड झाली आहे. त्याला बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, क्रीडा मार्गदर्शक मेजर मोहन वीरकर, शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभले. सैफअली हा भारतीय बॉक्सिंग संघात निवड झालेला सातारा जिल्ह्यातील पहिला पुरुष बॉक्सिंग खेळाडू आहे. त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य मोहिते, राजेंद्र शेजवळ, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, हरीश शेट्टी, संतोष कदम, सतीश शिंदे, योगेश बनकर, संजय पवार, तेजस यादव, बापूसाहेब पोतेकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.