सातारा : सातारा शहर तसेच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चौघेजण वेगवेगळ्या घटनेत बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर, सातारा येथून अक्षय भैरु कदम (वय 33, रा. शाहूनगर) हा युवक दि. 27 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला आहे. सोलापूरला जावून येतो, असे सांगून तो घरातून गेला. मात्र तो परत आला नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
दुसर्या घटनेत दिलीपभाई दिनूभाई नाथाभाई पारेख (वय 50, मूळ रा. गुजरात) हे दि. 3 मार्च रोजी सातारा एमआयडीसी परिसरातून बेपत्ता झाले आहेत. शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
तिसर्या घटनेत प्रणय किशोर गालफाडे (वय 24, रा.गेंडामाळ झोपडपट्टी) हा युवक 5 मार्च रोजी बेपत्ता झाला आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
चौथ्या घटनेत 21 वर्षाची युवती सातारा तालुक्यातून बेपत्ता झाली आहे.