सातारा : सातारा शहरातील भाजी मंडईत एकाच दिवशी ६ मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. सातारा शहरातील स्टँड समोरील भाजी मंडई, जुना मोटार स्टँड भाजी मंडई मध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या ६ नागरिकांचे मोबाईल चोरण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सकाळी १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास भाजी घ्यायला गेलेल्या ६ जणांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी खिशातून काढून घेतले आहेत. अंकुश रामचंद्र लोखंडे रा. कृष्णानगर सातारा, राजेंद्र रावबा शिंदे रा. जकातवाडी सातारा, विवेक महेंद्र मोरे रा. मोळाचा ओढा सातारा, रामचंद्र विठ्ठल अवकिरे रा. शाहुपुरी सातारा, योगेश भगवान माने रा. शनिवार पेठ सातारा, संतोष चंद्रकांत बागल, शाहूनगर सातारा अशी मोबाईल चोरी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सातारा शहरसह शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत.