कर्करोग निदान शिबिरात शेकडो महिलांची मोफत तपासणी; सातारा शहर, तालुका, जिल्ह्यातूनही महिलांची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 14 October 2025


सातारा : शहरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर ट्रस्ट, कृष्णा चारिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ सातारा, डॉ. आदित्य महाजन, श्रीकांत निकम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कर्करोग व विविध आजार चिकित्सा आणि तपासणी शिबिराला सातारा शहर, तालुका आणि जिल्ह्यातूनही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख सचिव प्रशांत तुपे हरीश शेठ, रोटरी क्लब ऑफ सातारा अध्यक्ष रोटेरियन किशोर डांगे, सचिव अभिजीत लोणकर, खजिनदार नीरज गांधी, डॉ. आदित्य महाजन, श्रीकांत निकम, मंदिराचे दिलीप आफळे, स्वयंसेवक कर्मचारी उपस्थित होते.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्यावतीने शेकडो महिलांनी तपासणी करून त्यावर उपचार व निदान जाणून घेतले. या शिबिरात दात, कान, नाक, घसा तसेच स्तनाचा कॅन्सर आणि महिलांच्या मूत्राश गर्भाशय गर्भाशय पिशवीची तपासणी याबाबत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरामध्ये घेण्यात आलेल्या सर्व तपासण्या या महिलांनी जर रुग्णालयात जाऊन केल्या तर त्यासाठी सुमारे पाच हजार रुपये इतका खर्च येत असतो. मात्र सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून सर्व तपासणी मोफत स्वरूपात देण्यात आली, याबद्दल धनंजय देशमुख यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रोटेरियन तसेच संस्थांचे आभार मानले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवसेना शिंदे गटाचे गटाचे सातार्‍यात आज शक्तिप्रदर्शन; मेळाव्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
पुढील बातमी
कुटूंबाची फसवणूक करत तारण कर्जातील दहा तोळे सोने हडपले; विघ्नहर्ता गोल्ड ट्रेडिंग कंपनीच्या प्रमुखासह तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या