कापडगावची खताळ टोळी दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेश

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : सातारा जिल्ह्यातील कापडगाव, ता. फलटण येथील टोळीप्रमुख विकी उर्फ बाळू बापूराव खताळ वय 23 राहणार कापडगाव ता फलटण यांच्यासह अन्य दोघांना दोन वर्षासाठी गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार सातारा जिल्ह्यासह पुणे सोलापूर जिल्हा हद्दीतून दोन वर्ष तडीपार करण्यात आले आहे. याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. खताळ याच्यासह शुभम उर्फ सोनू घुले वय 23 राहणार कापडगाव तालुका फलटण व सुयोग हिंदुराव खताळ वय 27 राहणार कापडगाव तालुका फलटण या दोघांना सुद्धा हा आदेश लागू करण्यात आला आहे

या प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपअधीक्षक राहुल धस यांनी केली. या टोळीतील इसमांवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीतील सदस्य लोणंद तसेच परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत होती. समीर शेख यांनी त्यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन खताळ टोळीला सातारा, पुणे व सोलापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2022 पासून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार 38 उपद्रवी टोळ्यांमधील 131 इसमांना, तर कलम 56 प्रमाणे 38 इसमांना, कलम 57 नुसार चार इसमांना अशा एकूण 173 इसमांच्या विरोधात तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता हद्दपारी, मोका, एमपीडीए अशा कठोर कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे आदेश समीर शेख यांनी दिले आहेत. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, नितीन भोसले, अमोल जाधव, स्नेहल कापसे यांनी योग्य तो पुरावा सादर केला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराणी ताराबाई यांच्या समाधीला वज्रलेप
पुढील बातमी
विवाहिता बेपत्ता

संबंधित बातम्या