सातारा : लाईट पोलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या कोरेगाव तालुक्यातील युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अश्विन शंकर गाडे (वय ३०, रा. भीमनगर, ता. कोरेगाव) हे अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १० जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची माहिती दिल्यानंतर संबंधित कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी नोंद केली असून पुढील चौकशी पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.