साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध

by Team Satara Today | published on : 18 February 2026


सातारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. 

घोषणाबाजी आणि निदर्शने: आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमा होऊन हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. "छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सपकाळांचा धिक्कार असो," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष संबोधल्याने हिंदूंच्या , शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. "शिवरायांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही," अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.

आंदोलनानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. "जर सपकाळ यांनी माफी मागितली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा" या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. 

यावेळी विश्व हिंदू परिषद सातारा जिल्हाध्यक्ष विजय गाडवे, राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे जिल्हा कार्यवाह महेश शिवदे, पश्चिम महाराष्ट्र समरसता मंचाचे मुकुंद आफळे, सातारा शहर कार्यवाह रवी गायकवाड, विजय फडके, अजित देशपांडे, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार ,प्रवीण शहाणे, अस्मिताताई लाड दुर्गा वहिनी जिल्हा संयोजिका, संगीता ताई भोसले मातृ शक्ती जिल्हा सहसंयोजिका निशाताई लोहार मातृशक्ती शहर संयोजिका, जिल्हा सहमंत्री श्री दीपक दीक्षित, विराज खंदारे , सिद्धनाथ सोनटक्के बजरंग दल, मदन महाराज धर्माचार्य संपर्कप्रमुख, रीना भणगे, वैशाली टंकसाळे, वैष्णवी कदम, राहुल शिवनामे ,विक्रम बोराटे, नितीन कदम, कैलास सुतार, अविनाश खर्शीकर, आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी नागरिक ,उपस्थित होते


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोरेगावचे पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक; विशेष पोलीस महानिरीक्षकांसमोर वाचला तक्रारींचा पाढा
पुढील बातमी
वडगाव येथील विद्यार्थिनींना तातडीने दाखले द्या अन्यथा आंदोलन छेडणार; दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांचा इशारा; प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या