सातारा : सुमारे 80 हजारांच्या बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 दरम्यान सावि अपार्टमेंट, विकास नगर, खेड, सातारा येथील चालू बांधकामाच्या ठिकाणाहून सुमारे 80 हजार रुपये किंमतीच्या साहित्यासह बॅटऱ्या चोरून नेल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात शुभम दिलीप कांबळे रा. विकास नगर, खेड यांनी फिर्याद नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पोतेकर करीत आहेत.