आज महात्मा गांधींची जयंती. 'राष्ट्रपिता' म्हणून ओळख असणारे महात्मा गांधी हे भारतातील नव्हे तर जगभरातील लोकांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज scam 1992 फेम हंसल मेहता यांनी 'गांधी' वेबसीरिजची अधिकृत घोषणा केलीय.
गेल्या अनेक महिन्यांपासून या वेबसीरिजची चर्चा होती. अखेर आज गांधी जयंतीनिमित्त 'गांधी' वेबसीरिजची अधिकृत घोषणा झालीय. या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत कोणता अभिनेता झळकणार याचाही खुलासा झालाय. हा अभिनेता साकारणार महात्मा गांधींची भूमिका हंसल मेहतांनी त्यांच्या सोशल मीडियावर महात्मा गांधींवरील वेबसीरिजची घोषणा केलीय. हंसल मेहतांनी वेबसीरिजच्या घोषणेचा व्हिडीओ पोस्ट केलाय. यात गांधी ही अक्षरं स्क्रीनवर येतात. मागे एका अभिनेत्याच्या सावलीची आकृती दिसते. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे प्रतीक गांधी. प्रतीक गांधी वेबसीरिजमध्ये महात्मा गांधींच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ही वेबसीरिज महात्मा गांधींचा तरुणपणीचं आफ्रिकेतलं कार्य दाखवणार असल्याची शक्यता आहे. ए.आर.रहमान यांचं संगीत 'गांधी' वेबसीरिजला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर.रहमान यांनी संगीत दिलंय. त्यामुळे या वेबसीरिजला उत्कृष्ट संगीत असणार यात शंका नाही. महात्मा गांधींच्या आयुष्याचा पट या वेबसीरिजच्या माध्यमातून कसा उलगडला जाणार, हा सर्वांसाठी कुतुहलाचा विषय आहे. या वेबसीरिजच्या रिलीजची तारीख अजून जाहीर झाली नाही. तरीही यावर्षाच्या अखेरीस किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही वेबसीरिज रिलीज होईल, अशी शक्यता आहे. याविषयी ए.आर.रहमान म्हणाले की, "गांधीजींच्या युवा आयुष्याला बघणं ही एक पर्वणी आहे. आयुष्याबद्दल त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग पाहून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कसा विकास होत गेला याचा प्रत्यय येतो. अप्लॉज़ एंटरटेनमेंटच्या सहकार्याने आणि हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या कलाकृतीला संगीत देणं हा माझा स्वतःचा सन्मान आहे."
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |
घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |
पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट भेटीवर जोर |
जयंत पाटील यांनी साताऱ्यात घेतला मतदारसंघनिहाय आढावा |
अमित कदम यांच्या शिवसंवाद यात्रेचा परळी मध्ये झंझावात |
कोरेगावात बेबंदशाही ; विरोधात 'स्टेटस' ठेवले म्हणून हात मोडेपर्यंत झोडपले |
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
कुरवली खुर्द वृध्दाश्रमातील वृद्धांनी केला शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प |

मनोज जरांगेंनी केला 'महायुती'चा करेक्ट कार्यक्रम : हेमंत पाटील |
शिरवळ येथे ७ लाख ८६ हजार रुपयांची बेकायदेशीर दारू जप्त |
कारमधून पाच लाखाचे दागिने चोरीस |
कारची कन्टेनरला धडक; एकाचा मृत्यू |
चौघांकडून युवकाला मारहाण |