सातारा व जावली मतदारसंघातील विविध शासकीय रुग्णालयात रुग्णसेवेला ना. शिवेंद्रराजे यांच्यामुळे बूस्टर

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय, जिल्हा स्‍त्री रुग्णालय यासह सातारा व जावली मतदारसंघातील विविध शासकीय रुग्णालयात अनेक डॉक्टर्सची पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना उपचार घेताना अडचणींचा सामना करावा लागत होता. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन ना. भोसले यांनी आरोग्य मंत्री ना. आबिटकर यांच्यासोबत चर्चा करून तसेच शासन स्तरावर बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यासाठी ४८ नवीन डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. यामध्ये स्‍त्री रोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ आदी स्पेशालिस्ट डॉक्टरांचा समावेश आहे.
या नियुक्त्यांमध्ये जिल्हा रुग्णालयासाठी १०, जिल्हा स्‍त्री रुग्णालयात ५, जावली तालुक्यात ४ आणि सातारा तालुक्यात ४ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. उर्वरित डॉक्टरांची नियुक्ती जिल्ह्यातील इतर ठिकाणी होणार आहे. या नवीन डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे शासकीय रुग्णालयांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होणार आहे. रुग्णांना अधिक चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा, वेळेत उपचार आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कापिल येथील श्रीरामनगर परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर; सततच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जिल्ह्यातील ३४५८१ शेतकरी कर्जमुक्त, ४ हजार ८७६ शेतकऱ्यांना ३२ कोटी ९८ लाख रुपयांचा लाभ

संबंधित बातम्या