मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचना

रस्त्याची केली पाहणी

by Team Satara Today | published on : 01 September 2025


‎वाई : वाई, पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटनवाढीच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सुरूर ते कुंभरोशी या महामार्गाच्या कामाची गती वाढवा अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या. 

‎वाई ते सुरूर दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाची मदत व पुनरसन मंत्री मकरंद पाटील यांनी पाहणी केली. यावेळी एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. नायकवडी, 

‎बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गोंजरी, किसनवीर कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, शशिकांत पवार, सत्यजीत वीर, महादेव म्हस्कर, अशोक मांढरे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

‎ मंत्री पाटील म्हणाले, मुंबई - पुणे येथून पाचगणी,महाबळेश्वर व वाईला लाखो पर्यटक भेट देण्यासाठी देतात. त्यांच्या सुविधेसाठी व दळण-वळण वेगाने होण्यासाठी महत्वाचा ठरणारा हॅम -2 योजने अंतर्गत सुरू असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून,सुरूर -वाई -पाचगणी- महाबळेश्वर -कुंभरोशी असा साधारण 59 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 293 कोटी आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय आणखी वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल. वाई ते सुरूर रस्त्याच्या - चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीने चालू असल्याने या परिसरातील व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम गतीने व्हावे, अशा सूचना दिल्या.

‎ठेकेदारावर कारवाईचा इशारा
‎‎ठेकेदाराने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे खोदले असून रस्त्याची दुरवस्था झाली अहे. रस्ते विकास महामंडळाच्या ठेकेदाराने अतिशय चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून वाई ते सुरूर दहा किलोमीटर अंतरात अनेक ठिकाणी खोदून ठेवल्याने रस्त्यावरून साधे चालता सुध्दा येत नाही. यासह अनेक अडचणींचा पाढा स्थानिक व व्यावसायिकांनी वाचला. यावेळी काम लवकर न झाल्यास ठेकेदारावर कारवाईचा इशारा मंत्री मकरंद पाटील यांनी दिला.
‎सुरूर ते कुंभरोशी या महामार्गाच्या कामाचे पाहणी करताना मकरंद पाटील. त्यावेळीएमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता श्री. नायकवडी, बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजरी, किसनवीर कारखान्याचे संचालक शशिकांत पिसाळ, शशिकांत पवार, सत्यजीत वीर, महादेव म्हस्कर, अशोक मांढरे व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पवारांनी तामिळनाडूप्रमाणे आरक्षण का दिले नाही? : ना. शिवेंद्रराजे
पुढील बातमी
कास फुलोत्‍सवास गुरुवारपासून प्रारंभ

संबंधित बातम्या