महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. अश्विनी बदादे सन्मानित; पहिल्या स्त्रीवादी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मान

by Team Satara Today | published on : 30 October 2025


सातारा : कोल्हापूर येथे आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील महिलांचा लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भुईंज येथील डॉ. अश्विनी बदादे यांना त्यांच्या वैदकीय व काव्य लेखन कार्यातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार संमेलनाध्यक्षा रंजना सानप, स्मिताताई पानसरे, ऍड करुणा विमल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचाराचा वारसा चालवीणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां स्मिता पानसरे यावेळी म्हणाल्या अश्विनी बदादे यांच्या सारख्या मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उंचीवर नेले पाहिजे त्यांनी वैद्यकीय सेवा करीत काव्य लेखनाची आवड जोपासात आपल्या लिखाणातून महिलांना दिशा व मार्ग दाखवीत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरावे, तसेच स्त्रीने समाजातील प्रत्येक घटकात सर्वोच्च काम केले पाहिजे. 

यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती पवार, सरलाताई पाटील, सुमन पुजारी, सुचिता गायकवाड, डॉ. शोभा चाळके सुमन पाटील यांच्यासह राज्य भरातून आलेल्या लेखिका कवियित्री यांच्या उपस्थिती होती. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अरे बापरे हे काय? ऐकावे ते नवलच.... त्यातर निघाल्या जयश्री दिगंबर नव्हे जयश्री संतोष आगवणे
पुढील बातमी
खुनाच्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सासपडेच्या राहुल यादव याला पुन्हा अटक; गावातीलच एका अल्पवयीन मुलीचा खून केल्याची दिली कबुली

संबंधित बातम्या