सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीनजण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील 23 वर्षीय युवती दि. 23 रोजी देगाव फाटा येथील हॉटेल प्रिती येथून कोणास काहीही न सांगता निघून गेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गुरव अधिक तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत, धनंजय बबन उभे (वय 42, कासार आंबवली, पुणे) हा येथील ओल्ड शॉपिंग सेंटर, सदरबझार येथून दि. 24 रोजी कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे. याबाबत ओंकार नामदेव आटाळे (वय 35, रा. कासार आंबवली, पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत.
तिसर्या घटनेत, जमीर कमाल पाशा मौलवी (वय 46, रा. शनिवार पेठ, सातारा) हे दि. 5 रोजी कोणास काहीही न सांगता निघून गेले आहेत. याबाबत समीरा जमीर मौलवी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार सुडके तपास करत आहेत.