सातारा : मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान गेल्या अनेक वर्षापासून सबंध भारतभर महाराष्ट्रभर आणि सातारा जिल्ह्यामध्ये विशेषता आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम केले जाते. या कामाची सुरुवात सायक्लोन या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून 2014 सालापासून झालेली आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सेरेब्रल पाल्सी विद्यार्थ्यांसाठी पाटण, सातारा, वाई, खंडाळा, पाचगणी, तारळे या सहा ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आले.
यामध्ये फिजिओथेरपी आणि स्पीचथेरपी दिली जाते. सातारा जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवडीचे काम देखील मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून झालेला आहे, आणि निक्षय मित्र या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत गेल्या दीड वर्षापासून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खंडाळा या तालुक्यातील टीबी ग्रस्त रुग्णांसाठी पोषणयुक्त आहार देण्यात येत आहे. तसेच वयोवृद्ध लोकांसाठी आरोग्य तपासणीची शिबिरे होत असतात. त्यात ज्यांना गरजेच्या शस्त्रक्रिया आहेत, त्या शस्त्रक्रिया देखील मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती, शाळेमध्ये शौचालय, लायब्ररी, अशा विविध प्रकारचे काम गेल्या अनेक वर्षापासून अविरत सुरू आहेत.
याच आरोग्य उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळा खंडाळा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 480 मुलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळेस बिडिओ अनिल वाघमारे, गटशिक्षणाधिकारी आडे, फिनोलेक्स कंपनीचे डी.व्ही. आयर, मुकुल माधव फाउंडेशन चे संतोष शेलार, जितेंद्र जाधव, पार्थ कलाल आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते. यावेळी बिडिओ अनिल वाघमारे सर यांनी फिनोलेक्स जे काम करतोय त्याचं कौतुक केलं, आणि असेच काम इथून पुढे समाजातील घटकांसाठी सुरू राहावं ही आशा व्यक्त केली. या शिबिरामध्ये भारती विद्यापीठ आणि एच. वि. देसाई येथील बालरोगतज्ञ, नाक ,घसा, कानाचे तज्ञ, डेंटिस्ट. आपथमोलॉजिस्ट यांनी त्यांचा सहभाग नोंदवला.
ज्या लोकांना गरज आहे त्यांना पुढील तज्ञ डॉक्टरांकडे रेफर करण्यात आले. ज्या मुलांना काही पुढे जाऊन मदतीची गरज असेल, त्या ठिकाणी मुकुल माधव फाउंडेशन मदतीसाठी कटिबद्ध असेल असे मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळेतील दोन गरीब गरजू मुलांचे जे पालक होते, की ज्यांचा उदर निर्वाह रोज काम केल्यानंतरच चालतो. अशा गरजू गरीब लोकांसाठी दोन सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या सर्व उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले.