औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणाला वेग; तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंची तब्बल साडेसहा तास चौकशी

by Team Satara Today | published on : 29 July 2026


मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला मुंबई गुन्हे शाखेने वेग दिला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे यांची मंगळवारी तब्बल साडेसहा तास गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर चौकशी केली. गांगुर्डे आपल्या वकिलासोबत हजर झाले होते. चौकशीदरम्यान गांगुर्डे यांनी पेपरफुटीच्या आरोपांबाबत आपल्याकडे असलेली माहिती आणि उपलब्ध पुराव्यांची माहिती अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

गांगुर्डे यांनी यापूर्वी एमपीएससीकडे ई-मेलद्वारे तक्रार करत, २२ मार्च रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या दोन दिवस आधी काही व्हॉट्सॲप गटांवर प्रश्नपत्रिकेतील बहुतांश प्रश्न फिरत असल्याचा दावा केला होता. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान गांगुर्डे यांच्याकडील मोबाईलमधील संदेश, व्हॉट्सॲप चॅट, ई-मेल आणि इतर डिजिटल पुराव्यांबाबत माहिती घेण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात या डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक पडताळणी होण्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा
पुढील बातमी
खंडाळ्यातील घटना; आलिशान कारमधून आलेल्या टोळीने एटीएम मशिन फोडून दोन लाख ३४ हजार ४०० रुपये लंपास केले

संबंधित बातम्या