गुजरातमधील निराली बोटीचा अपघात

पालघरमधील 4 मच्छिमार खलाशांचा दुर्देवी मृत्यू

by Team Satara Today | published on : 06 March 2025


पालघर : खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे. या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. या अत्यंत दुर्देवी अशा अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीतून एकूण सात खलाशी प्रवास करीत होते. अपघात झाला तेव्हा ते खोल समुद्रात होते. मच्छिमारी करून परतत असताना या बोटीला दुर्घटना झाली. दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या
पुढील बातमी
राज्यभरात एकाच वेळी सुट्ट्या आणि परीक्षाही

संबंधित बातम्या