सातारा : आर्थिक लाभाच्या आमिषाने सहाजणांची सुमारे दीड कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 फेब्रुवारी 2022 ते 14 ऑक्टोबर 2024 दरम्यान विकास बबन सस्ते व त्याची पत्नी दोन्ही मूळ रा. निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा. सध्या रा. शंभूराज अपार्टमेंट बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी शेअर मार्केटमध्ये व राजश्री एंटरप्राइजेस या डाळिंब खरेदी विक्री कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा चार टक्के परतावा देतो, असे आमिष दाखवून गणेश वसंतराव जगदाळे रा. मलठण तालुका फलटण, दीपक नामदेव जगदाळे, संदीप भानुदास टोणगे दोन्ही रा. रामबाग फलटण तालुका फलटण, दयानंद श्रीरंग वाघमोडे रा. निंभोरे ता. फलटण, सचिन शामराव तावरे रा. निरगुडी ता. फलटण, धीरज चंद्रकांत जाधव रा. साखरवाडी ता. फलटण यांची एक कोटी 44 लाख 21 हजार 650 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम करीत आहेत.