सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्या. फलटणमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर, कराडमध्ये उदयसिंह पाटील, पाटणमध्ये शंभूराज देसाई, तर माणमध्ये जयकुमार गोरे यांनी विजय मिळवला. महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे यांनी संजय मोरे यांचा पराभव केला. जावळीमध्ये ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली, तर खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले विजयी झाले.
माण तालुका सोसायटी मतदारसंघात गोरे बंधू आमने-सामने आल्याने या लढतीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते. या लढतीत मंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. तर बंधू शेखर गोरे यांना केवळ ७ मते मिळाली. मनोज पोळ यांना १४ मते मिळाली.
सोसायटी मतदारसंघातील निकाल
फलटण मतदारसंघात संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ७१, तर समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना ६० मते मिळाली.कराड सोसायटी मतदारसंघात उदयसिंह पाटील यांना १००, तर धनंजय पाटील यांना ४४ मते मिळाली. जावळी सोसायटी मतदारसंघात ज्ञानदेव रांजणे यांना ३८, तर विठ्ठल गोळे यांना ८ मते मिळाली. महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे यांना ८, तर संजय मोरे यांना ४ मते मिळाली. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांना ५८, तर सत्यजित पाटणकर यांना ४६ मते मिळाली. खंडाळ्यात अजय भोसले यांना २८, भाजपचे संजीव गाढवे यांना २१, तर अपक्ष शामराव गाढवे यांना शून्य मते मिळाली.
राखीव प्रवर्गांतील मतांची आकडेवारी
अनुसूचित जाती प्रवर्गात दीपक चव्हाण यांनी ६१८ मते मिळवून विजय मिळवला. भटके-विमुक्त प्रवर्गात अर्जुन काळे यांना ३४९, तर सुनील वाघ यांना २८४ मते मिळाली. ओबीसी प्रवर्गात योगेश फडतरे यांना ६०४, तर संतोष पाचांगणे यांना ३३ मते मिळाली. विणकर मतदारसंघात चंद्रकांत जाधव यांना ८९, तर सुनील वाघ यांना ७ मते मिळाली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत संजीवराजे, उदयसिंह, शंभूराज, जयकुमार गोरे विजयी
कोरेगावमध्ये चिठ्ठीद्वारे होणार निकाल; जावळीमध्ये ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली, खंडाळ्यात जय भोसले विजयी
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा