राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्ह्याला कांस्यपदक

by Team Satara Today | published on : 01 August 2023


सातारा : अरुणाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर मुलांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटना व सातारा बॉक्सिंग अकॅडमीचा खेळाडू सैफअली झारी याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदक पटकावले.

बुधवार नाका, सातारा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सैफअली याने ४ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांच्याकडे बॉक्सिंग चा सराव करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान झालेल्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सैफअलीने २ सुवर्ण, २ रौप्य पदके पटकावली. त्याच्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत  त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले. त्याच्या या यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी सैफअली आणि त्याला घडवणारे प्रशिक्षक सागर जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचेअध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष जगन्नाथ जगताप, कार्याध्यक्ष हरीश शेट्टी, रवींद्र होले, अमर मोकाशी, संजय पवार, बापूसाहेब पोतेकर, तेजस यादव, विनोद राठोड यांनीही दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठीशुभेच्छा दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
टोमॅटोची डबल सेंच्युरी कायम, पालेभाज्यांचे दर घसरले, बाजारात आल्याची चमक कायम
पुढील बातमी
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे

संबंधित बातम्या