सातारा : चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निलेश बाळकृष्ण गायकवाड रा. राधिका रोड, सातारा यांच्या घरासमोरील लावलेल्या गाडीतून विवो कंपनीचा मोबाईल आणि जिओ कंपनीचा डोंगल चोरी करताना सागर जालिंदर माने रा. जांब बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा यास पकडण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.