टायगरचा ‘बागी ४’ चित्रपट अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. तसेच या चित्रपटाचा ट्रेलरने प्रदर्शित होता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. याचदरम्यान आता चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनी टायगर श्रॉफ पुन्हा परतला असल्याचे सांगितले आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टचे आणि कथेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
‘बागी ४’ या चित्रपटाच्या कथेचे कौतुक चाहते करत आहेत, तसेच टायगरचा जबरदस्त कमबॅक झाल्याचे देखील म्हटले आहे. वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया x (ट्विटर) अकाउंटवर समोर आल्या आहेत. एका वापरकर्त्याने चित्रपटाबद्दल लिहिले की, ‘या चित्रपटाची कथा ‘बागी’ फ्रँचायझीच्या इतर चित्रपटांपेक्षा चांगली आहे. चित्रपटाचे पहिले ३० मिनिटे अद्भुत आहेत.’ दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘चित्रपटातील गाणी, अॅक्शन, एकंदरीत, तो एक मोठा मनोरंजन करणारा चित्रपट ठरला आहे.’ दुसऱ्या वापरकर्त्याने टायगरच्या अभिनयाचे कौतुक केले आणि ट्विट केले की, ‘टायगर श्रॉफचा रॉनीच्या भूमिकेतला अभिनय तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कथा तुम्हाला तुमच्या जागेवरून हटवू देणार नाही. संजय दत्तचे पात्र चित्रपटाच्या थरारात भर घालते.’
‘बागी ४’ चित्रपटात टायगर श्रॉफ प्रेमात सर्व मर्यादा ओलांडताना दिसला. खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्तने वर्चस्व गाजवले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका एक्स (ट्विटर) वापरकर्त्याने संजय दत्तच्या अभिनयाचे कौतुक केले. वापरकर्त्याने लिहिले की, ‘संजय दत्त जादूगार आहे, तो फक्त खलनायकाची भूमिका करत नाही, तर तो तुम्हाला त्याचा राग आणि वेदना देखील जाणववून देतो. ‘बागी ४’ मध्ये संजय दत्तच्या ‘वास्तव’ चित्रपटातील क्रूरता आणि भावनिकतेची झलक देखील दिसते.
टायगर श्रॉफच्या ‘बागी ४’ या ॲक्शन चित्रपटात संजय दत्त आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. या संपूर्ण स्टारकास्ट तगडी आहे. या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार काम करताना दिसले आहेत ज्यामध्ये हरनाज कौर संधू, सोनम बाजवा, श्रेयस तळपदे आणि सौरभ सचदेवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ए हर्ष यांनी केले आहे.