सातार्‍यातील बालनिरीक्षण गृहातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : सातार्‍यातील बालगृह तथा बालनिरीक्षण गृहातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना 18 रोजीच्या रात्री घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास बालगृहातील हॉलमध्ये मुलांना कपडे वाटप सुरू होते. यावेळी दोन परप्रांतीय मुले तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्यांना कायदेशीर देखरेखीतून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय पांडुरंग साबळे (वय 33, रा. शिवतर, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरळे, वडूथ परिसरातील डीपींमधून सुमारे 130 किलो वजनाची तांब्याची तार चोरीला; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
आ. रामराजेंची दोन्ही मतदारसंघांतून माघार; बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांना पुढे मिळाली चाल

संबंधित बातम्या