सातारा : पतीस मारहाण केल्याप्रकरणी पत्नी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तम पांडुरंग साळवी रा. समता पार्क, शाहूपुरी, सातारा यांना किरकोळ कारणावरून त्यांची पत्नी भाग्यश्री पुरुषोत्तम साळवी यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.