सातारा : पीक कर्ज व्याज परतावा देण्याची भूमिका
केंद्र व राज्य सरकारने घेतल्यामुळे शेतकर्यांनी त्यांना मतदान केले. आज ते
सत्तेवर आल्यानंतर सुद्धा पीक कर्ज व्याज न दिल्याने शेतकरी संघटनेचे व किसान
मंचचे नेते शंकरराव गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी
प्रत्यक्षात भेट देऊन निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला. यामुळे जिल्हा बँक, जिल्हा
उपनिबंधक कार्यालय व जिल्हा प्रशासनाची चांगलीच धावपळ पाहण्यास मिळाली.
शेतकर्याकडून वसूल केलेल्या पीक कर्ज व्याजाचा
बिनव्याजी वापर करत आहे. या प्रश्नाबाबत शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेचे नेते
शंकरराव गोडसे आणि पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी आज सातारचे
जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा बँकेचे सर्व व्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे व
उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी बाबुराव शेळके, व्हि.जे. जाधव यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या
जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत जिल्हा
प्रशासन जिल्हा बँक व जिल्हा उपनिबंधक कार्यालय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहे.
शेतकरी पीक कर्ज व्याज परतावा मिळावा. यासाठी प्रस्ताव सादर केला असून लवकरच
शेतकर्यांच्या खात्यामध्ये व्याजाची रक्कम देण्यात यश मिळेल असे आश्वासन त्यांनी
दिले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित यादव, पाटण तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, अजित
जगताप, दत्ता पवार,दिनेश चव्हाण, संदीप बिचुकले, मुरलीधर शिंदे, नामदेव क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, संदीप गायकवाड व वैभव गवळी यांच्यासह रवी जाधव ,प्रशांत
कदम, सुरेश शिंदे, संतोष फाळके, माधुरी घोलप आदी शेतकरी यांनी पीक कर्ज व्याज न दिल्याने शेतकर्यांच्या व्यथा
मांडल्या. मुंबई येथे होणार्या राज्य सरकारच्या विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच
सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचे व्याज परतावा मिळण्याची आशा पल्लवीत
झालेली आहेत.
पिक कर्ज व्याज वसुली जिल्हा बँकेकडून पण सरकारने पाठ फिरवली आहे. याबाबत
शेतकरी संघटनेचे नेते गोडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आक्रमक झाले होते. त्यांनी
शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत वस्तूस्थितीची जाणीव करून दिली.
शेतकर्यांच्या आत्महत्या प्रमाण वाढलेला आहे. पीक
कर्ज व्याज वसुली सातारा जिल्हा बँकेकडून झाली पण व्याज परतावा देताना केंद्र व
राज्य सरकारने पाठ फिरवली आहे, नाबार्ड चे पुरस्कार मिळवण्यासाठी सातारा जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँक व विकास सेवा सोसायटीने शेतकर्यांचे कर्ज वसुली शंभर टक्के
केली त्याचे सर्वांनी स्वागत आहे परंतु शेतकर्याचे हाती काय मिळाले ?केंद्र
व राज्य सरकारने सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी व्याज परतावा देण्याची घोषणा केली
होती. यामध्ये पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेअंतर्गत, 4.5 राज्य
सरकारने पीक कर्ज व्याज परतावा देण्याचे मान्य केले आणि त्यामध्ये अर्धा टक्का
कपात केली याचा फटका अनेकांना बसला आहे. साखर कारखान्याची संबंधित मंत्री आमदार
झाले पण सातारा जिल्ह्यात आजही शेतकर्यांच्या बाबत दुजाभाव केला जात आहे.
याबाबतही श्री शंकर गोडसे यांनी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. दिनांक 27 मार्च
रोजी होणार्या उपोषणाची जबाबदारी आता सातारा जिल्हा प्रशासनाची राहील, असाही त्यांनी इशारा दिला आहे.
शेतकरी संघटनेच्या इशार्याने जिल्हा प्रशासनाची धावपळ
by Team Satara Today | published on : 05 March 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा