सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांना विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 3 रोजी संध्याकाळी खोडद, ता. सातारा गावच्या हद्दीतील महामार्गावर उभ्या असलेल्या एका कारला दगडे मारून जोरजोरात आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पंकज संजय तावरे (रा. सिंहगड कॉलेज, ता. हवेली, जि. पुणे) आणि संभाजी विलास खोपडे (रा. अंबाडे, ता. भोर, जि. पुणे) यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.