सातारा : नेले येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या भव्य कामाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मंदिराचा परिसर अधिक आकर्षक व प्रशस्त करण्यासह भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कामासाठी दानशुरांसह भाविकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांनी सांगितले की, मंदिराच्या कामामध्ये सुशोभीकरण, परिसर विकास तसेच इतर आवश्यक बांधकामांचा समावेश असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या वैभवात भर पडणार असून सातारा जिल्ह्यात एका वेळेस 2000 लोक बसण्याची क्षमता असणारे हे एकमेव मंदिर असणार आहे. या कामासाठी 1 कोटी 40 लाखांचे अंदाजपत्रक असून मंदिर गाभारा, सभामंडप व मंदिराच्या प्रागंणासह एकूण बांधकाम क्षेत्र 4450 चौरस फूट आहे. ग्रामस्थ, भैरवनाथ भक्त आणि विविध मान्यवरांच्या सहकार्याने हे भव्य कार्य सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या वैभवात भर पडणार आहे.
मंदिराचे बांधकाम आर्किटेक्ट महेश कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावातीलच इंजि. अभिजित केसुगडे व इंजि. सुधीर जाधव करणार असून सुभाष जाधव, सुनील जाधव, संदीप वाघमळे, बाळासाहेब सावंत, महादेव धोत्रे, अशोक जाधव, ॲड. सचिन जाधव, दत्तात्रय जाधव, सुनील चंद्रकांत जाधव, सुनील कुंभार, चंद्रकांत टिळेकर, आनंदा कांबळे, आनंदा जाधव, किसन जाधव, रमेश पिसाळ, राजेंद्र नलवडे, देवेंद्र डांगे, सुधाकर केसुगडे, रोहित जाधव, धनाजी जाधव, हेमंत काळंगे, महेंद्र टिळेकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमामुळे नेले परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मंदिराचे काम दर्जेदार व नियोजित पद्धतीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. श्री भैरवनाथाच्या कृपेने आणि सर्वांच्या सहकार्याने हे भव्य कार्य लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ज्यांना या कामासाठी मदतीचा हात द्यावयाचा आहे त्यांनी सुभाष जाधव (96237086122), अशोक जाधव (96890517903), बाळासाहेब सावंत (99238087134), संदीप वाघमळे (9423516812), सुनील जाधव (78758229446), महादेव धोत्रे (99506202957) व सुनील कुंभार (9870459588) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नेले ग्रामस्थ व श्री भैरवनाथ मंदिर उभारणी कमिटीने केले आहे.
नेले येथील भैरवनाथ मंदिराच्या उभारणीस सहकार्य करण्याचे आवाहन; 1 कोटी 40 लाखांच्या कामास आरंभ; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा