पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देश प्रगतीपथावर - ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले; काळाराम मंदिर येथे महाआरती उत्साहात

by Team Satara Today | published on : 10 June 2026


सातारा :  जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ देशसेवा करणारे पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त करीत आहेत. देशाची चौफेर प्रगती साधणार्‍या पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेला उन्नतीकडे नेण्याबरोबरच देशाला आर्थिक आणि संरक्षणदृष्ट्या स्वयंपूर्ण केले आहे. मोदीजींमुळे देश प्रगतीपथावर असून त्यांच्या हातून अधिक देशसेवा घडो आणि देशाची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशा शुभकामना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारकरांच्या वतीने दिल्या.

मोदीजींनी सर्वाधिक काळ देशसेवा करणारे पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला असून यानिमित्त काळाराम मंदिर रामाचा गोट, सातारा येथे आज ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा शहरातील सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व शुभेच्छूक यांनी महाआरती करून मा.पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

यावेळी सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक राजू गोरे, नगरसेवक शंकर माळवदे  नगरसेवक रवी पवार, नगरसेवक सुशांत महाजन, नगरसेवक विजय देसाई,  नगरसेविका सिद्धी पवार, नगरसेविका अर्चना कांबळे, नगरसेविका पूनम निकम, मुकुंदजी आफळे, सुनील काटकर, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
यशवंतराव मोहिते कृष्‍णा साखर कारखाना निवडणुकीत दुरंगी सामना; ५३ उमेदवारांचे अर्ज मागे, लढतीचे चित्र स्पष्ट
पुढील बातमी
सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयाला घेराव; आंदोलनकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी

संबंधित बातम्या