03:34pm | Sep 04, 2024 |
सातारा : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, लाईफ मेंबर बोर्डाचे माजी सदस्य, मराठी साहित्यातील सिद्धहस्तलेखक, प्रा. अजित आप्पासाहेब पाटील यांचे आज बुधवार दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी सांगली या ठिकाणी वृध्दपकाळाने दुखःद निधन झाले आहे.
प्रा. अजित पाटील हे रसायनशास्त्र या विषयाचे अभ्यासू प्राध्यापक म्हणून सर्व परिचित होते. यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा परिचय होता. संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण केली होती. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी प्रा. अजित पाटील यांनी तन-मन-धन अर्पण करून अखंड कार्य केले आहे. कर्मवीरांचे विचार सर्वदूर पोहोचावेत यासाठी त्यांनी शेकडो व्याख्यानांच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कर्मवीरांचे विचार पोहोचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला.
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबरोबरच, मराठी साहित्यातील एक सिद्धहस्त लेखक म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. कर्मवीरायण माणसातील देव, चंदनाचे पाय, गौतम बुद्ध, सूर्यपुत्र लोकमान्य टिळक, खरा महात्मा जोतीबा, खासेराव आण्णांची इष्कबाजी यासारख्या सर्वोत्तम दर्जाच्या कलाकृतींची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांच्या विनोदी कथा संग्रहास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट वाड.मयाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व आचार्य अत्रे विनोद व प्रौढ वाड.मय निर्मितीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर शब्दांचे गाव व शब्द हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. साधना, मार्मिक यासारख्या प्रतिथयश मासिकांमधून अडीचशेहून अधिक विनोदी कथा व कविता प्रसिध्द झाल्या आहेत. ‘माणसातील देव’ या कर्मवीरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे सातारा आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः वाचन झाले होते. साहित्यातील निर्मितीबरोबरच रसायनशास्त्र या विषयातील अनेक क्रमिक पुस्तकांचे लेखनही प्रा. अजित पाटील यांनी केलेले होते. एक सिद्धहस्त लेखक म्हणून विद्यार्थी आणि मराठी वाचक त्यांना ओळखत होते.
प्रा. अजित पाटील यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. आज बुधवार दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |