सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोडोली, सातारा येथून संजय अशोक पन्हाळकर (वय 38, रा. देगाव रोड, कोडोली) हे दि. 21 जून रोजी कामाला जातो, असे सांगून घरातून गेले. मात्र ते परत आले नाहीत. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.