सातारा : मित्राला मारहाण का करता, असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला करण्यात आला. पाचवड, ता. वाई येथे झालेल्या या घटनेत रोख रक्कम व डीव्हीआर मशीन असा ३० हजार ७०० रुपयांचा ऐवजही लंपास झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशाल मदन पिसाळ (३२, रा. बावधन) यांनी भुईंज पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अमर विलास माने व अतुल सखाराम जाधव यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, मारहाण, चोरीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला.
दि. १ रोजी रात्री हॉटेल मलाबारसमोर किरण कुंभार याला मारहाण सुरू असताना पिसाळ यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर त्यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या झटापटीत इतर दोघांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करीत आहेत.
मित्राला मारहाण का करता असा जाब विचारल्याच्या रागातून तरुणावर दगडाने हल्ला
by Team Satara Today | published on : 06 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा