फलटण : फलटण-दहिवडी रस्त्यावर बुवासाहेब नगर कोळकी येथील ‘कार केअर’ या वर्कशॉपला गुरुवार (दि.१६) मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कार वर्कशॉप तसेच याठिकाणी दुरुस्तीसाठी आलेल्या आठ गाड्या जळून खास झाल्या. आगीत साडेतीन कोटींचे नुकसान झाले.
आग लागल्यानंतर थोड्याच वेळात नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये असलेले दहा ते अकरा चारचाकी वाहने, नवीन विक्रीसाठी ठेवलेले स्पेअर पार्ट स्पेअर पार्ट वगैरे जळून पूर्णपणे खाक झाले. मध्यरात्री पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनीही भेट दिली.
आज सकाळी गाव कामगार तलाठी सचिन क्षीरसागर, ग्रामविकास अधिकारी रमेश साळुंखे, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्यांनी घटनास्थळी भेट दिली व मदतीचे आश्वासन दिले. ऐन दिवाळीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
गेल्या दहा वर्षांपूर्वी शेंडे बंधूंनी या कार केअर सेंटरची स्थापना केली होती. आग नक्की कशामुळे लागली? याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.