सातारा : दादाज बिर्याणी हाऊस समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दादाज बिर्याणी हाऊस समोर पार्क केलेली अजित रामसिंह लोहिया रा. दौलत नगर, सातारा यांची दुचाकी एक्टिवा क्र. एमएच ११ डीडब्ल्यू ६८२० अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.