सातारा : अधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 27 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 मे ते 30 जुलै 2026 दरम्यान हर्षद विनेंद्रलाल शहा (रा. समर्थ नगर, सातारा) यांची अधिक परताव्याच्या आमिषाने 27 लाख 42 हजार 501 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी रवी शर्मा व एका महिलेच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शेवाळे करीत आहेत.