सातारा : सातारा शहर सह तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अंगापूर वंदन, ता. सातारा गावच्या हद्दीतील बाजार पटांगण तिरंगा तालमीच्या आडोशाला संजय धनाजी भिसे रा. कोरेगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 670 रुपये रोख व जुगाराचे साहित्य करण्यात आले आहे.
दुसऱ्या घटनेत, सातारा शहरातील शिवराज पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशास जितेंद्र बबन गायकवाड रा. विलासपूर, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 670 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.