मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन 3'मध्ये दमदार अभिनेत्याची एन्ट्री?

by Team Satara Today | published on : 24 September 2024


'द फॅमिली मॅन' ही सर्वात गाजलेली वेब सिरीज आहे. या सिरीजचे आधीचे दोन भाग प्रेक्षकांना फार आवडले.  राज आणि डीके यांनी बनवलेल्या या सिरीजमधील मनोज यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता चाहत्यांना मनोज यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. अशातच आता 'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझन संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. 

मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्ये एका दमदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हा सीझन खऱ्या अर्थाने थ्रिलर असणार आहे. कारण, 'द फॅमिली मॅन'मध्ये एन्ट्री घेणार अभिनेता आहे जयदीप अहलावत. मनोज वाजपेयी स्टारर वेब सिरीज  'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप पाहायला मिळणार आहे. मात्र, यामधील त्याची भुमिका काय असेल, याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. 

रिपोर्टनुसार, द फॅमिली मॅन' सिरीजच्या तिसऱ्या सीझनची शुटिंग सुरू आहे. लवकर ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचे अ‍ॅक्शन सीन्स चाहत्यांना प्रचंड आवडले.  सिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटी आता पुढल्या सीझनमध्ये श्रीकांत तिसऱ्या कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना दिसणार आहे, असे संकेत देण्यात आले होते. आता सीझन ३ मध्ये निर्माते प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येतात हे पाहणं खरोखरच मनोरंजक असेल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'ड्रीम गर्ल'सोबत झळकणार 'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री!
पुढील बातमी
इस्रायल-लेबनान सीमेवर भारतीय सैन्याचे 600 जवान तैनात

संबंधित बातम्या