सातारा ; सदरबझार येथील जय मल्हार हौसिंग सोसायटी, कातकरी वस्ती येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय पूनम जाणू शिंदे यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दि. १५ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कबीर यांनी दिली. मयत पूनम शिंदे यांच्या लग्नाला बारा वर्षे पूर्ण झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल करीत आहेत.
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 17 January 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा