सातारा : अल्पवयीन मुलीचे फोटो तांत्रिक सहाय्याने एकत्र करुन युवकाने ते फोटो इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर पोस्ट करुन ‘आमचे दोघांचे लव्ह अफेअर आहे,’ असे म्हणत विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओंकार असे संशयिताचे नाव असून याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना मे 2024 पासून वेळोवेळी घडली आहे. संशयिताने मुलीचा मोबाईल नंबर घेवून तिच्याशी ओळख वाढवली. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनही तिचा पाठलाग करत तिची छेड काढून विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.