युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण

by Team Satara Today | published on : 30 August 2024


सातारा : बोगद्यातील मुलांशी बोलतो आणि त्यांना चुगल्या करतो म्हणून चौघांनी 19 वर्षीय युवकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शाहूपुरी चौकातील पवार वॉशिंग सेंटर परिसरात घडली आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार घडला.
स्वराज्य धनंजय अहिरे वय 19 रा. 45 चिमणपुरा पेठ यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम अडागळे रा. हिंदवी स्कूल जवळ शाहूपुरी, प्रेम गणेश पवार, राज गणेश पवार, दोघेही रा. शुक्रवार पेठ सातारा, अनिकेत सोमनाथ अहिवळे रा. होलार गल्ली मंगळवार पेठ अशी संबंधित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोगद्यातील मुलांशी बोलतो. त्याला संबंधितांच्या चहाड्या सांगतो म्हणून प्रेम अडागळे व राज पवार यांनी अहिरे याला शाहूपुरी चौकात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली व लाकडी दांडक्याने मारहाण केली. प्रेम पवार व गणेश पवार यांनी त्याला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत अहिरे जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस हवालदार राजगे अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नोकरीच्या आमिषाने महिलेची 80 हजारांची फसवणूक
पुढील बातमी
झेडपीसमोर खेडचे सरपंच यांचे ठिय्या आंदोलन

संबंधित बातम्या