सातारा शहराच्या विकास आराखड्यामध्ये गंभीर त्रुटी; नगरसेविका मुक्ता लेवे यांचे नगरपालिकेला पत्र :आरक्षणे लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात

by Team Satara Today | published on : 05 March 2026


सातारा  : सातारा नगरपालिकेने शहराचा तयार केलेल्या विकासा आराखड्यामध्ये अत्यंत गंभीर त्रुटी असून त्या तातडीने दूर केल्या पाहिजेत. शहरात विकास कामांसाठी टाकण्यात आलेले आरक्षणे लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणात आहे त्यामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात या प्रश्नाकडे भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका मुक्ता लेवे यांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

याबाबतचे महत्त्वपूर्ण निवेदन त्यांनी प्रशासनाला सादर केले या निवेदनात नमूद आहे की, हद्दवाढ क्षेत्रातील रस्ते यांची संपर्क समन्वयता ठेवण्यात आलेली नाही .हे रस्ते एकमेकांना जोडलेले नाहीत. उदाहरणार्थ प्रसाद हौसिंग सोसायटी सदर बाजार येथील बिल्डिंग आराखडा मंजूर आहे त्यानुसार इमारत पूर्ण झाली आहे .त्या ठिकाणी आजही रस्ता अरुंद ठेवण्यात आला आहे सध्या हद्दीतील मोकळ्या जागांवर झोनिंग करण्यात आलेले नाही. अर्क शाळा ते होंडा शोरूम पर्यंतचा रस्ता चौदा मीटर दाखवला आहे त्यापुढे हा रस्ता किती मीटर आहे ते कळत नाही शाहूपुरीतून माळवाडी आणि त्यापुढे कोंडवे कडे जाणारा रस्ता दाट लोक वस्तीतून जातो तेथे 18 मीटर रस्ता करण्याची गरज आहे तो रस्ता आजही 12 मीटर ठेवण्यात आला आहे. वाढीव हद्दीमध्ये कॉमन पार्किंगची व्यवस्था व आरक्षण नाही. समर्थ मंदिर ते बोगदा दरे खुर्द भाग नो डेव्हलपमेंट झोन करण्यात आलेला आहे .मंगळवार पेठ म्हसवडकर कॉलनी येथील सर्वे क्रमांक 57 मधून 18 मीटर रोड काढून टाकण्यात आलेला आहे.

अशा विविध प्रकारच्या गंभीर त्रुटींमुळे सातारा शहराच्या विकासाला खीळ बसू शकते या विकास आराखड्यांमध्ये असंख्य त्रुटी आहेत .त्यामुळे नगराध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी याबाबत विशेष सभा घेऊन पुन्हा शहराच्या विकास आराखड्यावर चर्चा करावी .स्वतंत्र आराखडा तयार करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि तो शासनाला सादर करावा अशी मागणी मुख्यालय यांनी केली आहे.








लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला वकिलाला मारहाण करत विनयभंग; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
विभागीय अधिस्विकृती समितीच्या बैठकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

संबंधित बातम्या