आळंदीत पावसातही हरिनामाच्या गजरात भक्तिरसाचा जल्लोष; वारकऱ्यांच्या फुगड्यांनी रंगली वारी

by Team Satara Today | published on : 08 July 2026


आळंदी : टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भक्तिकल्लोळ..माउली- माउली असा अखंड जयघोष.. वैष्णवांच्या मेळ्याने अन पुराणे भरून आलेला  इंद्रायणीचा काठ..माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा..अशा वातावरणाने अलंकापुरी दुमदुमून गेली.

शहरातील इंद्रायणी नदीवरील पूरपरिस्थिती पाहता प्रशासनाने वारकऱ्यांना केलेले शहरात न येण्याचे आवाहन आणि आळंदी देवस्थानने केलेली मोजक्याच वारकरी,मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा पार पाडण्याचे नियोजन यामुळे शहरातील रस्त्यावर अधिक गर्दी न होता तुरळक वारकऱ्यांची गर्दी दिसून येत होती; मात्र शहरात दाखल झालेल्या दिंड्यांनी उत्साहात पावसाच्या सरी झेलत हरिनाम गजरात फुगड्यांचे फेर धरल्याचे दिसून आले.

प्रदक्षिणा रस्त्यावरील दिंडीतील भाविकांनी फुगडीचा फेर धरला तर काहींनी टाळ मृदूंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला. शहरात प्रस्थान सोहळ्यानिमित्त उत्साह संचारला असून पालखी संध्याकाळी मंदिराबाहेर पडल्यानंतर त्यात अधिक भर पडणार असल्याचे दिसून येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुलींसाठी विशेष फेरी जाहीर; 10 ते 11 जुलै अर्जाची संधी
पुढील बातमी
शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात जाऊन सदिच्छा भेट घेतली; भेटीची राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

संबंधित बातम्या