सातारा : अपघातात महिलेस जखमी केल्याप्रकरणी अज्ञात टेंम्पो ट्रॅव्हलर चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, होमगार्ड असलेल्या दुचाकीवरील महिलेला ठोसेघर गावच्या हद्दीत सातारा-ठोसेघर रस्त्यावर अज्ञात टेंम्पो ट्रॅव्हलरची धडक बसल्याने त्या अपघातात जखमी झाल्या. मानसी पोपट मोहिते (वय 37, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे त्यांचे नाव आहे. अपघाताची घटना 2 ऑगस्ट रोजी घडली आहे. समोरुन येणार्या ट्रॅव्हलरची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.