सातारा : एकास मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तेहसीन अश्फाक शेख रा. एसटी कॉर्टर्स, सातारा यांच्या मुलाला किरकोळ वादावरून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच कृष्णात शंकर गायकवाड यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गवळी करीत आहेत.