वेगवेगळ्या घटनेत तीनजण बेपत्ता

सातारा : सातारा शहर परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी हर्षद कमर रिजवान सिद्दिकी रा. पिरवाडी, सातारा हा युवक एमआयडीसीतील कंपनीतून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, सागर साहेबराव शेटे रा. करंजे पेठ, सातारा हे दि. 24 ते 26 दरम्यान राहत्या घरातून निघून गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत, सातारा शहर परिसरातील एका उपनगरात राहणारी विवाहिता दि. 24 रोजी राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


मागील बातमी
दारूचे दुकान फोडून सुमारे लाखभराची रोकड लंपास
पुढील बातमी
एकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या